पुणे - तब्बल ९२ हजार मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात
पुणे, 17 डिसेंबर, (हिं.स.) - महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीवर हजारो हरकती व सूचना आल्या होत्या. त्यामध्ये एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये मतदारांची नावे जाण्याचा प्रकार मोठा होता. ९२ हजारांहून अधिक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागा
पुणे - तब्बल ९२ हजार मतदारांची नावे दुसऱ्याच प्रभागात


पुणे, 17 डिसेंबर, (हिं.स.) - महापालिकेच्या प्रारूप मतदारयादीवर हजारो हरकती व सूचना आल्या होत्या. त्यामध्ये एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागामध्ये मतदारांची नावे जाण्याचा प्रकार मोठा होता. ९२ हजारांहून अधिक मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे उघड झाले आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीनंतर मतदारांची नावे मोठ्या संख्येने इतर प्रभागांमध्ये जाण्याचा हा प्रकार उघडकीस आला आहे.

महापालिकेने प्रारूप मतदारयादी जाहीर केली. त्यानंतर मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात बदली होण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात घडला होता. त्यामुळे मतदारांसह राजकीय पक्षांमध्येही चांगलाच गोंधळ उडाला होता. नागरिकांनी त्यावर आक्षेप नोंदवीत निवडणूक आयोगाकडे तब्बल २२ हजार ८०९ इतक्‍या तक्रारींचा पाऊस पाडला होता.निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर महापालिका प्रशासनानेदेखील स्वतःहून ४५ हजार ४०३ इतक्‍या हरकती घेतल्या होत्या. दोन्हींमधील १८ हजार १५० इतक्‍या हरकती महापालिकेने अमान्य केल्या. एकूण ४७ हजार ७३ इतक्‍या हरकती मान्य केल्या होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande