रत्नागिरी जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा
रत्नागिरी जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश


रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १२ वाजल्यापासून १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

आगामी काळात जिल्ह्यात विविध सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम, निवडणूक प्रक्रिया तसेच औद्योगिक प्रकल्पांशी संबंधित आंदोलनांची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा आदेश देण्यात आला आहे. येत्या २० डिसेंबर रोजी संत गाडगे महाराज पुण्यतिथी, २३ डिसेंबरला विनायक चतुर्थी, २४ डिसेंबर साने गुरुजी जयंती, २५ डिसेंबर ख्रिसमस, २७ डिसेंबर गुरु गोविंदसिंह जयंती, ३१ डिसेंबरला भागवत एकादशी व नववर्ष स्वागत असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड, देवरूख परिसरात औद्योगिक प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ संदर्भातील आंदोलन, तसेच ओबीसी व मराठा आरक्षण प्रश्नांमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. याशिवाय नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राजकीय तणाव वाढू शकतो. त्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्या प्रशासनाने नमूद केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande