कोल्हापूर - कॅप्टन शंकर सखाराम वाळकर यांना एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून अभिवादन
कोल्हापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.)।१९७१ साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात १७ डिसेंबर रोजी वीरमरण पत्करलेले महावीर चक्र सन्मानित कॅप्टन शंकर सखाराम वाळकर (१८ मद्रास रेजिमेंट) यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पार्क, कोल्हापूर येथे ६ महाराष्ट्र ग
कॅप्टन शंकर सखाराम वाळकर यांना अभिवादन


कोल्हापूर, 17 डिसेंबर, (हिं.स.)।१९७१ साली पाकिस्तान विरुद्ध झालेल्या युद्धात १७ डिसेंबर रोजी वीरमरण पत्करलेले महावीर चक्र सन्मानित कॅप्टन शंकर सखाराम वाळकर (१८ मद्रास रेजिमेंट) यांच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा पार्क, कोल्हापूर येथे ६ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी बटालियन, कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कॅप्टन शंकर सखाराम वाळकर यांच्या स्मारकास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात येवून उपस्थित ४०० कॅडेट्सनी हुतात्मा पार्क परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.

यावेळी कोल्हापूरमधील निवृत्त लष्करी अधिकारी, मद्रास रेजिमेंटचे माजी सैनिक तसेच १८ मद्रास रेजिमेंटचे सेवारत अधिकारी, सैनिकांनी कॅप्टन वाळकर यांच्या तत्कालिन असीम शौर्याचे तसेच देशासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण करून मार्गदर्शन केले.

याप्रसंगी ६ महाराष्ट्र गर्ल्स एनसीसी बटालियनचे सुभेदार मेजर, माजी सैनिक, एनसीसी अधिकारी, कायमस्वरूपी कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande