
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : लोटे येथील रोटरी क्लब आणि इनरव्हील क्लब यांच्या माध्यमातून पद्माकर सुतार यांच्या विशेष प्रयत्नाने विज्ञानरथ फिरती प्रयोगशाळा हा उपक्रम खेड, लोटे, दापोली, चिपळूण परिसरातील शाळांमध्ये राबवण्यात आला.
या उपक्रमात ९ शाळांमधील साडेतीन हजार विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. भौतिक आणि रसायनशास्त्र या विषयावर विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्रयोग प्रत्यक्ष मुलांकडून करून घेतल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
हा विज्ञानरथ तामिळनाडू येथील परीक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ वीरुधुनगर यांच्या संकल्पनेने गावातील मुलांसाठी सायन्स ऑन व्हील ही थीम घेऊन साकारला आहे. सायन्समधील तज्ज्ञ व शिकवण्याचे कौशल्य असलेल्या शिक्षकांसह इनरव्हील क्लबच्या प्रमुख उत्कर्षा पाटील यांच्यामुळे या परिसरात तामिळनाडूतून हा प्रकल्प राबविण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी