भारतात शाओमी हायपरओएस 3 अपडेटचा रोलआउट सुरू
मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। शाओमीने भारतातील युजर्ससाठी अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 अपडेटचा रोलआउट सुरू केला आहे. शाओमी, रेडमी आणि पोको या ब्रँड्समधील निवडक स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्समध्ये हा नवा ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट टप्प्याटप्प्याने उपलब्ध क
Xiaomi HyperOS 3


मुंबई, 17 डिसेंबर (हिं.स.)। शाओमीने भारतातील युजर्ससाठी अँड्रॉइड 16 वर आधारित हायपरओएस 3 अपडेटचा रोलआउट सुरू केला आहे. शाओमी, रेडमी आणि पोको या ब्रँड्समधील निवडक स्मार्टफोन्स आणि टॅबलेट्समध्ये हा नवा ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जात आहे. शाओमी इंडियाचे असोसिएट डायरेक्टर (मार्केटिंग अँड पीआर) संदीप शर्मा यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली असून, सध्या शाओमी 14, शाओमी पॅड 7, रेडमी नोट 14 5G, रेडमी 13, पोको F7 आणि पोको M7 प्रो 5G या डिव्हाइसेसना हायपरओएस 3 अपडेट मिळण्यास सुरुवात झाली आहे.

कंपनीने यापूर्वी सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये शाओमी 17, शाओमी 17 प्रो आणि शाओमी 17 प्रो मॅक्स हे स्मार्टफोन्स HyperOS 3 सह सादर केले होते. त्यानंतर आता हळूहळू जुने आणि मिड-रेंज डिव्हाइसेसही या नव्या ऑपरेटिंग सिस्टिमकडे अपडेट होत आहेत. युजर्स आपल्या फोन किंवा टॅबलेटमध्ये Settings मधील My Device सेक्शनमध्ये जाऊन HyperOS बॅनरवर टॅप करून ‘Check for update’ या पर्यायाद्वारे अपडेट उपलब्ध आहे की नाही, हे तपासू शकतात. अपडेट उपलब्ध असल्यास ‘Download and Install’ असा पर्याय दिसेल. इंस्टॉलेशनदरम्यान डिव्हाइस एक-दोन वेळा रीस्टार्ट होणे ही सामान्य प्रक्रिया आहे.

HyperOS 3 मधील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे HyperIsland फीचर, जे अ‍ॅपलच्या Dynamic Islandसारखे काम करते. स्क्रीनच्या वरच्या बाजूला पिल-शेप डिझाइनमध्ये नोटिफिकेशन्स दिसतात, त्यामुळे महत्त्वाच्या सूचना लगेच लक्षात येतात. चार्जिंगदरम्यान फोनची चार्जिंग स्पीडही या HyperIslandमध्ये दिसते. याशिवाय, अपडेटमध्ये नवीन dual island design देण्यात आला असून, त्याच्या मदतीने अ‍ॅप बदलण्याची गरज न पडता विविध टास्क्स सहज मॅनेज करता येतात. स्टिल फोटोमधून डायनॅमिक वॉलपेपर आणि सिनेमॅटिक लॉक स्क्रीन तयार करण्याचे फीचरही या अपडेटमध्ये जोडण्यात आले आहे.

Android 16 बेस्ड HyperOS 3 मध्ये Xiaomi HyperAI tools चा समावेश आहे. यामध्ये AI writing tools, स्मार्ट स्क्रीन रेकग्निशन आणि DeepThink mode यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. युजर्सना मेसेज आणि ईमेलचा टोन बदलण्याची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय, AI Speed Recognition फीचरमुळे ऑडिओ रेकॉर्डिंगची गुणवत्ता सुधारते, रिअल-टाइम ट्रान्सक्रिप्ट तयार करता येते आणि ऑडिओचा थोडक्यात सारांश मिळतो. एकूणच, HyperOS 3 अपडेटमुळे शाओमी, रेडमी आणि पोको डिव्हाइसेस अधिक स्मार्ट, वेगवान आणि युजर-फ्रेंडली होणार असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande