ट्रम्प सरकारची 7 देशांवर पूर्ण, 15 देशांवर आंशिक प्रवासबंदी
वॉशिंग्टन , 17 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेचा हवाला देत स्थलांतर धोरण अधिक कठोर केले आहे. मंगळवार, 16 डिसेंबर रोजी ट्रम्प प्रशासनाने आणखी सात देशांवर तसेच पॅलेस्टिनी नागरिकां
ट्रम्प सरकारचा 7 देशांवर पूर्ण, 15 देशांवर आंशिक प्रवासबंदी


वॉशिंग्टन , 17 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक सुरक्षेचा हवाला देत स्थलांतर धोरण अधिक कठोर केले आहे. मंगळवार, 16 डिसेंबर रोजी ट्रम्प प्रशासनाने आणखी सात देशांवर तसेच पॅलेस्टिनी नागरिकांवर पूर्ण प्रवासबंदी (ट्रॅव्हल बॅन) लागू केली. याशिवाय, आणखी 15 देशांच्या नागरिकांच्या अमेरिकेत प्रवेशावर आंशिक निर्बंध लादण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे अमेरिका कडून प्रवासबंदी किंवा प्रवेश निर्बंधांचा सामना करणाऱ्या देशांची एकूण संख्या 39 वर पोहोचली आहे. व्हाइट हाऊसच्या फॅक्ट-शीटनुसार, हे विस्तारित प्रवास निर्बंध आणि प्रवेशावरील मर्यादा 1 जानेवारीपासून लागू होतील. प्रशासनाचे म्हणणे आहे की, कमकुवत व्हिसा तपास प्रणाली, व्हिसा ओव्हरस्टेचे उच्च प्रमाण आणि दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नवीन घोषणेनुसार बुर्किना फासो, माली, नायजर, दक्षिण सुदान आणि सीरिया यांच्यावर पूर्ण प्रवासबंदी लादण्यात आली आहे. तसेच, पॅलेस्टिनी अथॉरिटीने जारी केलेली प्रवास कागदपत्रे असलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांनाही प्रतिबंधित यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, लाओस आणि सिएरा लिओन या देशांवरही आता पूर्ण प्रवासबंदी लागू करण्यात आली असून, यापूर्वी या देशांवर आंशिक निर्बंध होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande