
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद तसेच रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित शैक्षणिक साहित्यनिर्मिती स्पर्धेत मंडणगड तालुक्यातील अडखळ शाळेचे उपशिक्षक आनंद सुतार यांनी तालुका आणि विभागस्तरावर यश मिळवले आहे.
सातारा येथे झालेल्या विभागस्तरीय स्पर्धेत एकूण ४७ स्पर्धकांमधून मानवी अस्थिसंस्था आणि अंतरिंद्रिये या विषयावर त्यांनी सादर केलेल्या शैक्षणिक साहित्याला परीक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ते रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे यांनी त्यांचा गौरव केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी