पुणे - लोकशाही बळकट करण्याचा संकल्प; शेकडो लाभार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ
पुणे, 17 डिसेंबर (हिं.स.)''आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयप
पुणे - लोकशाही बळकट करण्याचा संकल्प; शेकडो लाभार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ


पुणे, 17 डिसेंबर (हिं.स.)'आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू”, अशी मतदानाची शपथ मतदारांनी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेतली आणि येत्या महापालिका निवडणुकीत १०० % टक्के मतदान करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत डूडूळगाव येथे उभारलेल्या प्रकल्पातील १ हजार १९० सदनिका तसेच किवळे येथील आर्थिक दुर्बल घटकांच्या ७५५ सदनिकांचे पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे संगणकीय सोडत झाली, यावेळी उपस्थित विजेते लाभार्थी, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाची शपथ देण्यात आली.यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त अण्णा बोदडे, सीओईपीचे विभागप्रमुख डॉ. सुधीर आगासे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, सहाय्यक आयुक्त डी. डी. कांबळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande