चिपळूणच्या तरुणांना जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती
रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित युवक-युवती व नागरिकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने आज च
जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती देणारी कार्यशाळा


रत्नागिरी, 17 डिसेंबर, (हिं. स.) : महाराष्ट्र शासनाचे उद्योग संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या संयुक्त विद्यमाने सुशिक्षित युवक-युवती व नागरिकांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने आज चिपळूणच्या आनंदराव पवार कॉलेजमध्ये देण्यात आली.

या कार्यशाळेत उद्योग निरीक्षक श्रीमती सपकाळ यांनी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांची सविस्तर माहिती दिली. विविध योजनांमधील गुंतवणूक, अनुदान, कर्जप्रक्रियेसह उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेले संपूर्ण मार्गदर्शन त्यांनी केले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत युवक-युवती व नागरिकांना स्वतःचे उद्योगधंदे सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.

श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आनंदराव पवार महाविद्यालयाचे चेअरमन मल्लेश लकेश्री यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, देशातील तरुण युवक-युवती हे देशाचे बलस्थान आहे. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता रोजगार निर्मितीकडे वळावे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande