डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - ऑनलाईन अर्जासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
परभणी, 17 डिसेंबर (हिं.स.)। परभणी, दि. 17 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - ऑनलाईन अर्जासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ


परभणी, 17 डिसेंबर (हिं.स.)।

परभणी, दि. 17 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यासाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक तपशील भरुन घेण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त आर.एच.एडके यांनी केले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या / शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलां/मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दिनांक 30 नोव्हेंबर, 2025 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती तालुका स्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र, ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी इत्यादी कारणामुळे विविध विद्यार्थी संघटना, पालक, विद्यार्थी यांचेकडून सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली असल्याचे श्री. एडके यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande