ठाण्यातील पाणीबाणीला जबाबदार ठेकेदारावर गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादी (श.प.) ची मागणी
ठाणे, 17 डिसेंबर (हिं.स.)। महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली असून त्यामुळे ठाण्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईस संब
ठाण्यातील पाणीबाणीला जबाबदार ठेकेदारावर गुन्हे दाखल करा; राष्ट्रवादी (श.प.) ची मागणी


ठाणे, 17 डिसेंबर (हिं.स.)। महानगर गॅसची वाहिनी टाकत असताना ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीला भगदाड पाडण्यात आले आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही जलवाहिनी फुटली असून त्यामुळे ठाण्यात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईस संबधित ठेकेदार जबाबदार असल्याने त्याच्यावर तसेच कारवाई न करणारे कार्यकारी अभियंता हणमंत पांड्ये यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.

१००० मी.मी. व्यासाची पिसे ते टेमघर परिसरातील जुनी सिमेंटची पाइपलाइन भिवंडी बायपास जवळ रांजनोली गाव या भागातील जुन्या सिमेंटच्या १००० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीजवळून महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू होते. या कामादरम्यान ड्रिलिंग करत असताना मुख्य जलवाहिनीला भगदाड पडले असून मोठी गळती सुरू झाली आहे.या घटनेमुळे गेल्या १५ दिवसांपासून ठाणे शहरातील नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित असून पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. या प्रकरणी डाॅ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी ठामपा आयुक्तांना पत्र देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत पत्रकारांशी बोलताना राजेश कदम म्हणाले की, ही घटना घडून १५ दिवस उलटले तरी संबंधित ठेकेदारावर अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा ठोस कारवाई झालेली नाही. या प्रकरणात तत्काळ लक्ष घालून जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर पूर्ण करावी. तसेच, ज्या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे ही हानी झाली आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून दंडात्मक पावले उचलावीत. त्याचसोबत अजून कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यास विलंब करणाऱ्या व या जलवाहिनीतून होणाऱ्या पाणीचोरीला पाठीशी घालणारे कार्यकारी अभियंता हणमंत पांडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande