म्यानमारमध्ये ४.४ तीव्रतेचा भूकंप
नेपीडॉ, 18 डिसेंबर (हिं.स.)।म्यानमार पुन्हा भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले आहे. म्यानमारमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली आहे. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाल्याच
म्यानमारमध्ये ४.४ तीव्रतेचा भूकंप


नेपीडॉ, 18 डिसेंबर (हिं.स.)।म्यानमार पुन्हा भूकंपाच्या जोरदार धक्क्यांनी हादरले आहे. म्यानमारमध्ये गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली आहे. सध्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती नाही.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) यांच्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्र २६.०७ अंश उत्तर अक्षांश आणि ९७.०० अंश पूर्व रेखांशावर होते. भूकंपाची नोंद सुमारे १०० किलोमीटर खोलीवर करण्यात आली.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, यापूर्वी ११ डिसेंबर रोजी म्यानमारमध्ये ३.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. तसेच १० डिसेंबर रोजी या भागात १३८ किलोमीटर खोलीवर ४.६ तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता. दरम्यान, २८ मार्च रोजी मध्य म्यानमारमध्ये ७.७ आणि ६.४ तीव्रतेचे भूकंप झाल्यानंतर, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) यांनी भूकंपग्रस्त भागांतील हजारो विस्थापित लोकांसाठी वेगाने वाढणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबाबत इशारा दिला होता. म्यानमारची लांब किनारपट्टी आणि भौगोलिक रचना यांमुळे तो मध्यम ते मोठ्या तीव्रतेच्या भूकंपांबरोबरच त्सुनामीच्या धोक्यालाही संवेदनशील आहे.भूकंप-संवेदनशील असलेल्या या प्रदेशात अलीकडच्या काळात सातत्याने भूकंपाच्या घटना नोंदवल्या जात आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande