अमेरिका तैवानला १० अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकणार, ट्रम्प यांची घोषणा
वॉशिंग्टन , 18 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने तैवानला १० अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक किमतीचे शस्त्रसाठ्याचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा, हॉवित्झर तोफा आण
अमेरिका तैवानला १० अब्ज डॉलर्सची शस्त्रे विकणार, ट्रम्प यांची घोषणा


वॉशिंग्टन , 18 डिसेंबर (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने तैवानला १० अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक किमतीचे शस्त्रसाठ्याचे पॅकेज देण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा, हॉवित्झर तोफा आणि ड्रोनचा समावेश आहे. या निर्णयामुळे चीनकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी रात्री उशिरा या शस्त्रांची विक्री जाहीर केली. ही घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणादरम्यान करण्यात आली. आपल्या भाषणात त्यांनी परराष्ट्र धोरणाचा थोडक्यात उल्लेख केला, मात्र चीनसोबतच्या व्यापार किंवा इतर मुद्द्यांवर भाष्य केले नाही.शस्त्रविक्रीसाठी करण्यात आलेल्या आठ करारांमध्ये ८२ हाय-मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम्स आणि ४२० आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टिम्स यांचा समावेश आहे. हीच ती प्रणाली आहे जी बायडन प्रशासनाच्या काळात युक्रेनला रशियाविरुद्ध संरक्षणासाठी देण्यात आली होती. या प्रणालींची किंमत चार अब्ज डॉलर्सहून अधिक आहे.

या विक्रीत ६० सेल्फ-प्रोपेल्ड हॉवित्झर सिस्टिम्स आणि इतर उपकरणांचाही समावेश असून त्यांची किंमतही चार अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ड्रोनची किंमत एक अब्ज डॉलर्सहून अधिक आहे. याशिवाय, एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक किमतीचे लष्करी सॉफ्टवेअर, ७०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या जॅव्हेलिन आणि TOW क्षेपणास्त्रांचा साठा, ९६ दशलक्ष डॉलर्सचे हेलिकॉप्टर सुटे भाग आणि ९१ दशलक्ष डॉलर्सचे हार्पून क्षेपणास्त्र दुरुस्ती (रिफर्बिशमेंट) किट्स यांचाही समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande