कौंडण्यपूर : निम्न वर्धा प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। भगवान श्रीकृष्णाचे सासर व विदर्भ राजकन्या श्री रुख्मिणी मातेचे तसेच पंचसतीचे माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर नदीपात्रात भोई समाजबांधव कित्येक दिवसांपासून उदरनिर्वाह म्हणून प्रवाशी बोट चालवीत असून गतकाळात गणपती
कौंडण्यपूर येथे बोटचालकांपासून पैसे घेणाऱ्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। भगवान श्रीकृष्णाचे सासर व विदर्भ राजकन्या श्री रुख्मिणी मातेचे तसेच पंचसतीचे माहेरघर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर नदीपात्रात भोई समाजबांधव कित्येक दिवसांपासून उदरनिर्वाह म्हणून प्रवाशी बोट चालवीत असून गतकाळात गणपती, दुर्गोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास सुरक्षेची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. अनेक वेळा नदीमध्ये बुडत असलेल्या भक्तांचे प्राण सुद्धा त्यांनी वाचविले असून, पोलीस प्रशासनाला मय्यत व्यक्ती शोधण्यासाठी सुद्धा अनेकदा त्यांनी मदत केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या बोट या सुरक्षित असून यामध्ये प्रवाशांना कुठलीही भीती नाही. असे असताना, दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी दुपारच्या दरम्यान निम्न वर्धा प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता श्री. डांगे हे आपल्या टीमसह कौडण्यपूर नदीघाटावर येऊन त्यांनी श्री जानरावजी केवदे, श्री सुधाकरराव केवदे, श्री प्रल्हादराव केवदे यांच्या प्रवाशी बोट बंद करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बोटचालकांनी त्यांना यासबंधीत आम्ही प्रशासनाकडे बोट चालविण्याची परवानगी सुद्धा मागितली आहे, सदर प्रवाशी बोटचा व्यवसाय हा आमचा उदरनिर्वाह असल्याचे सांगून बोट चालवू द्यावी, अशी विनंती सुद्धा केली. तरीसुद्धा निम्न वर्धा प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोट बंद करण्याच्या फक्त तोंडी सूचना दिल्या, व याबाबत कुठलीही लेखी नोटीस त्यांना दिली नाही. त्यानंतर उपकार्यकारी अभियंता श्री डांगे हे समोर निघून गेल्यानंतर त्यांच्या टीम मध्ये असलेले श्री हर्षद मेश्राम (कनिष्ठ अभियंता, निम्न वर्धा प्रकल्प) यांनी १५,००० रुपयांची मागणी केली. यावेळी बोट चालकांना भीती निर्माण झाली आणि त्यांनी सर्व मिळून त्यांना १२,००० हजार रुपये त्यांना दिले. याबाबत त्यांनी कुठलीही पावती बोट चालकांना दिली नाही. तसेच लेखी नोटीस सुद्धा दिली नाही. ही सर्व तक्रार घेऊन बोट चालकांनी कौंडण्यपूर विकासासाठी सातत्याने तत्पर असलेले भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या यांच्याकडे धाव घेतली, व घडलेला सर्व प्रकार पुराव्यानिशी त्यांच्यासमोर मांडला. तसेच सदर प्रकाराची लेखी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुद्धा केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनी सदर प्रकार हा गंभीर असून निम्न वर्धा प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा प्रताप दिनांक 15 डिसेंबर रोजी अमरावती दौऱ्यावर असलेले पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमक्ष मांडला. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सदर प्रकाराची तात्काळ दखल घेत कारवाई चे आदेश दिले. आणि बोटचालकांना प्रवाशी बोट चालविण्याची परवानगी देण्याचे सुद्धा आदेश संबंधितांना दिले. यावेळी रविराज देशमुख यांनी पालकमंत्री महोदयांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande