
मुंबई, १८ डिसेंबर (हिं.स.) : ख्यातनाम शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांच्या निधनाने भारतीय कला, संस्कृती आणि शिल्पपरंपरेला अपूर्णणीय अशी हानी झाली आहे. आपल्या प्रतिभावान हातांनी त्यांनी उभारलेली असंख्य शिल्पे ही केवळ दगड-धातूतील कलाकृती नसून ती आपल्या राष्ट्राची ओळख आणि गौरव ठरली आहेत, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
राम सुतार यांनी आपल्या दीर्घ कलासाधनेतून भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर मान्यता मिळवून दिली. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह त्यांच्या अनेक कलाकृतींमधून राष्ट्रभक्ती, संस्कृतीची मुळे आणि कलात्मक उत्कृष्टता यांचे दर्शन घडते.
त्यांच्या निधनाने एक महान कलाकार आपल्यातून निघून गेला असला, तरी त्यांच्या कलाकृती आणि त्यांनी निर्माण केलेली प्रेरणा सदैव जिवंत राहील.
या दुःखद प्रसंगी मी दिवंगत राम सुतार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या हार्दिक संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, अशा शब्दात मंत्री ॲड. शेलार यांनी आपल्या शोकभावना कळविल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी