बीडमध्ये महामार्गावर लूट करणाऱ्या टोळीला अटक
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील विविधमहामार्गावर प्रवाशांची वाहने अडवून त्यांना लुटणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले . त्यांच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागीने आणि रोकड असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल तपासा
बीडमध्ये महामार्गावर लूट करणाऱ्या टोळीला अटक


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।बीड जिल्ह्यातील विविधमहामार्गावर प्रवाशांची वाहने अडवून त्यांना लुटणाऱ्या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले . त्यांच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागीने आणि रोकड असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल तपासात पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

बीड जिल्ह्यातील धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लघुशंकेसाठी थांबलेली वाहने, किंवा इतर कारणांनी थांबलेल्या वाहनांमधील प्रवाशांना शस्त्राचा धाक धाक दाखवून, मारहाण करुन लुट, जबरी चोरी केल्याचे प्रकार मागील काही दिवसांत वाढले होते. असे का सुमारे प्रकार घडल्याने खळबळ

उडाली होती. त्यातच गेवराई पोलिस ठाणे हद्दीत वडगाव ढोक शिवारात साई दर्शनासाठी जाणाऱ्या तेलंगणाच्या प्रवाशांना लुटल्याचा प्रकार समोर आला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास करुन तीन जणांना गजाआड केले . हे सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. पोलिसांनी तपासात त्यांच्याकडून आतापर्यंत ११ तोळे सोने आणि रोकड असा १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande