१० हजारांची लाच : रावेरच्या उत्पादन शुल्क निरीक्षकासह पंटर जाळ्यात
जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) कारवाई न करण्याच्या बदल्यात १० हजारांची लाच मागून ती खासगी पंटरामार्फत स्वीकारताना रावेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षकासह खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. विजय पाटील असं ला
१० हजारांची लाच : रावेरच्या उत्पादन शुल्क निरीक्षकासह पंटर जाळ्यात


जळगाव, 18 डिसेंबर (हिं.स.) कारवाई न करण्याच्या बदल्यात १० हजारांची लाच मागून ती खासगी पंटरामार्फत स्वीकारताना रावेर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षकासह खासगी पंटरला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. विजय पाटील असं लाचखोर दुय्यम निरीक्षकाचे नाव असून भास्कर चंदनकर असं खासगी पंटरचे नाव आहे. या कारवाईने उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे.

ही कारवाई बुधवारी (दि.१७) रात्री उशिरा खानापूर, (ता. रावेर) येथे करण्यात आली. तक्रारदाराच्या वडिलांवर यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई झाली होती. पुढील कारवाई टाळण्यासाठी दुय्यम निरीक्षक विजय पाटील यांनी दहा हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने नोंदवली.

एसीबीकडे तक्रार त्यानुसार एसीबीने सापळा रचला. लाचेची रक्कम थेट न स्वीकारता ती खासगी पंटर भास्कर चंदनकर यांच्याकडे देण्यास सांगितले. यानुसार चंदनकरने दहा हजार रूपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात अटक केली. यानंतर विजय पाटील याला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधिक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने केली. विजय पाटील हे राज्य उत्पादन शुल्कच्या रावेर तालुक्यातील आंतरराज्यीय सीमा तपासणी नाक्यावर कार्यरत होते. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande