सीईओ महापात्र यांचा नवोदित अधिकाऱ्यांशी संवाद
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या २० परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी बुधवारी अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. ''यशदा''चे सत्र संचालक डॉ. आर. व्ही. पो
सीईओ महापात्र यांचा नवोदित अधिकाऱ्यांशी संवाद:प्रशिक्षणार्थी डीएसपी, डेप्युटी कलेक्टर यांना भविष्यातील कामकाजाचे धडे


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या २० परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी बुधवारी अमरावती जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेचे कामकाज समजून घेण्यासाठी त्यांनी हा दौरा केला. 'यशदा'चे सत्र संचालक डॉ. आर. व्ही. पोले यांच्या नेतृत्वाखाली हे अधिकारी १९ डिसेंबरपर्यंत राज्यभर अभ्यास दौरा करत आहेत.

या अभ्यास दौऱ्याचाच एक भाग म्हणून, बुधवारी सकाळी या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेला भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पंचायत विभागाचे डेप्युटी सीईओ बाळासाहेब बायस आणि सामान्य प्रशासन विभागाचे डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी उपस्थित होते.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. सीईओ संजीता महापात्र यांनी मेळघाटमधील विकासात्मक उपक्रमांबद्दल माहिती दिली. त्यांनी भविष्यात प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना लोकाभिमुख दृष्टिकोन, संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव ठेवण्याबाबत मार्गदर्शन केले. प्रशासनातील अनुभवातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण टिप्सही त्यांनी दिल्या. या भेटीमुळे परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाची ओळख झाली आणि भविष्यातील जबाबदाऱ्यांची जाणीव झाली, असे त्यांनी नमूद केले.या परिविक्षाधीन अधिकाऱ्यांमध्ये श्रद्धा उधवंत, सौरभ रंगटे, प्रणीता काळे, प्रतीभा काळे, अलम पंडू, परागीणी पाटील, अशोक बाराखोटे, सुनील धमाल, विठ्ठल पवार, सितारामजी रेवतकर, प्राजक्ता पाटील, आशिष खेनत, मच्छींद्र मिरकार, अनिकेत शकार्गे, राजू डोके, किरण काकडे, आशिष तालेवार, शुभम खोसे, नितीन मोरे, युवराज इकाद, महेश चोथे आणि स्नेहल माटे यांचा समावेश आहे. हे सर्व अधिकारी भविष्यात उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, गट विकास अधिकारी, सहायक विक्रीकर आयुक्त, सहायक परिवहन अधिकारी तसेच लेखा व कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर कार्यरत होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande