अमरावती : तिवसा तालुक्यात सीईओ संजिता महापात्र यांचा दौरा
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र यांनी बुधवारी तिवसा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी सालोरा बु. गावाला भेट देत ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या
तिवसा तालुक्यात सीईओ संजिता महापात्र यांचा दौरा; विद्यार्थ्यांसोबत घेतला शालेय पोषण आहार


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजिता महापात्र यांनी बुधवारी तिवसा तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी सालोरा बु. गावाला भेट देत ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. शाळेत भेट दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची शैक्षणिक गुणवत्ता तपासली. तसेच विद्यार्थ्यांसोबत बसून शालेय पोषण आहाराची चव चाखत आहाराच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी केली.या प्रसंगी गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, सरपंच ममता जाधव, उपसरपंच निता धाकडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत गावांतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांची सीईओंनी पाहणी केली. यामध्ये वनराई बंधारा, स्मशानभूमी विकास, वृक्षलागवड आदी कामांचा समावेश होता.दौऱ्यादरम्यान दिव्यांग बांधवांना ब्लँकेटचे वितरण करण्यात आले. तसेच अन्य लाभार्थ्यांना आयुष्मान भारत आरोग्य कार्डचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या डिजिटल उपक्रमांना चालना देत ग्रामपंचायतीच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही सीईओंच्या हस्ते करण्यात आले.यानंतर संजिता महापात्र यांनी करजगाव येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील विकासकामे, योजनांची अंमलबजावणी व प्रशासनिक बाबींचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामपंचायतींनी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिकाधिक लाभ द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

--------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande