
छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथे नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहून त्यांनी संबोधित केले. महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यपातळीवर सुरू असलेली विकासगंगा अविरतपणे स्थानिक पातळीवर चालू राहावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.
फुलंब्री नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे , माजी केंद्रीय मंत्री .रावसाहेब पाटील दानवे , आमदार संजयभाऊ केनेकर, संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे, भाजपा जिल्हा अध्यक्ष संजयभाऊ खंबायते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांची प्रचार सभा फुलंब्री येथे संपन्न झाली. प्रचारादरम्यान नागरिकांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुहासभाऊ सिरसाठ यांच्याशी थेट संवाद साधला.
स्थानिक पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि परिसर विकास यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि व्यक्त केलेला विश्वास यामुळे उमेदवारांचा उत्साह अधिक वाढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis