छ. संभाजीनगर - जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची क्रूर हत्या,
छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर जवळील ओहर जटवाडा गावच्या गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली. एक
छ. संभाजीनगर - जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची क्रूर हत्या,


छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)।

छत्रपती संभाजीनगर जवळील ओहर जटवाडा गावच्या गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांहू पठाण यांची क्रूरपणे हत्या केली.

एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा क्रूर टोळी मात्र लाठ्याकाठ्या, लाथांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घाव घालत होती. दादा पठाण यांचा मृत्यू झाला. रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत.

पठाण यांचे कुटुंब मूळ ओहर जटवाडा गावाचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांची जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे.

यातून अनेकदा वाद झाले. पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठ्याकाठ्या, रॉडने हल्ला केला. दादा पठाण जागीच मरण पावले.कानून हमारें हाथ में है' असे म्हणत त्यांनी दादा पठाण यांना लक्ष्य केले. शिवाय, स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव करण्यासाठी स्वतःच्याच दुकानाची तोडफोड केली. असे सांगितले जात आहे पोलिसांचे पथक गावात तैनात करण्यात आले आहे

-------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande