काँग्रेस आ. प्रज्ञा सातव यांचा तडकाफडकी राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश करणार
छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सुपूर्
प्रज्ञा सातव


छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.)। मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आपल्या पदाचा राजीनामा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला आहे. लवकरच सातव भारतीय जनता पक्षा मध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

काँग्रेस पक्षाचे नेते स्वर्गीय राजीव सातव यांच्या पत्नी असलेल्या प्रज्ञा सातव या काँग्रेस पक्षाच्या आमदार होत्या 2024 मध्ये त्यांची निवड करण्यात आली होती मात्र चार वर्षाचा कालावधी शिल्लक असताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे.

भारतीय जनता पक्षात त्या लवकरच प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande