उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीडला जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव
बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ दिवसांचा जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.बीडच्या सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देणारा चंपावती महोत्सव यंदा अधिक
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बीडला जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव


बीड, 18 डिसेंबर (हिं.स.)।जानेवारी महिन्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ८ दिवसांचा जिल्हास्तरीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.बीडच्या सांस्कृतिक परंपरेला नवा आयाम देणारा चंपावती महोत्सव यंदा अधिक भव्य स्वरूपात साजरा होणार आहे. जानेवारी महिन्यात होणाऱ्या या महोत्सवात नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला, रांगोळी आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धा होतील.

महोत्सवाचे संस्थापक अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी स्पर्धांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल, असे सांगितले. गतवर्षी ११ तालुक्यांतील १४ हजार सात बाल कलाकारांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांना मोठा मंच मिळावा, यासाठी जिल्हाभरातून महोत्सव दरवर्षी व्हावा, अशी मागणी होत होती. यंदाही कलाकार, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे.

या वर्षीच्या महोत्सवात समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, जोडी नृत्य, एकपात्री अभिनय, गीतगायन, चित्रकला, फॅमिली डान्स, वक्तृत्व आणि रांगोळी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके व प्रमाणपत्रे देण्यात येणार असून सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय सर्व स्पर्धांमध्ये सर्वाधिक बक्षिसे मिळवणाऱ्या शाळेला 'महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे महाकरंडक बेस्ट स्कूल ऑफ द इयर चॅम्पियनशिप' बहाल करण्यात येणार आहे. त्यामुळे शाळांमध्ये या करंडकासाठी प्रबळ स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande