श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये  क्रीडा महोत्सव
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या १८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमि
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमध्ये  आजपासून डॉ. पंजाबराव  देशमुख क्रीडा महोत्सव


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.)। विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत्या १८ व १९ डिसेंबर २०२५ रोजी श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127 व्या जयंती उत्सवानिमित्त वार्षिक भव्य ' क्रीडा महोत्सवाचे' आयोजन श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. सदर स्पर्धेमध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक , कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 1500 हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या दोन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन १८ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धनजी देशमुख यांच्या अध्यक्षतेत संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. दिलीपबाबु इंगोले यांच्या हस्ते होईल.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. तनुजा राऊत, प्र-संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती उपस्थित राहतील. या क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये धावणे (१००, २०० व ४०० मीटर), लांब उडी, गोळाफेक यांसारख्या वैयक्तिक क्रीडा प्रकारांसह कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १९ डिसेंबर रोजी विविध खेळांच्या अंतिम फेऱ्या पार पडतील. त्यानंतर संध्याकाळी ४:०० वाजता बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे . श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष ॲड. गजाननराव पुंडकर यांच्या अध्यक्षतेत होईल. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष, ॲड.जयवंत उपाख्य भैय्यासाहेब वि. पाटील (पुसदेकर) व कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष बनसोड, १९ व्या आशियाई खेळातील रजत पदक विजेता तुषार शेळके यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना चषक,पदक, पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. या स्पर्धेच्या आयोजना करीता संस्थेचे सचिव प्राचार्य वि.गो ठाकरे, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्पर्धेच्या आयोजन समितीचे सचिव डॉ. सुभाष गावंडे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपव्यवस्थापक पंडित पंडागळे व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande