
लातूर, 18 डिसेंबर (हिं.स.)। लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जिल्ह्यासाठी २०२५ वर्षातील स्थानिक सुट्ट्यांची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार, शुक्रवार, १९ डिसेंबर २०२५ रोजी 'दर्शवेळा अमावस्या' निमित्त संपूर्ण जिल्ह्यात स्थानिक सुट्टी असणार आहे.
सुट्टी कोणासाठी असेल?
सर्व शासकीय कार्यालये
जिल्हा परिषदेची सर्व कार्यालये
स्थानिक स्वराज्य संस्था (नगरपालिका/पंचायत समिती)
जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा आणि महाविद्यालये
जिल्ह्यातील सर्व शासकीय कोषागारे व महामंडळे
खालील कार्यालये सुरू राहतील:
उच्च न्यायालयाच्या अधिकार कक्षेतील कार्यालये.
सर्व केंद्रीय सरकारी कार्यालये.
बँका आणि वित्तीय संस्था.
विशेष आनंद: शुक्रवारी सुट्टी असल्याने नोकरी करणाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना सलग ३ दिवस सुट्टीची (शुक्रवार, शनिवार आणि रविवार) मोठी संधी मिळणार आहे!
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis