विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्नाटकचा संघ जाहीर, केएल राहुल, पडिक्कल आणि प्रसिद्धचा समावेश
बंगळुरु, 18 डिसेंबर (हिं.स.)कर्नाटकने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) धोरणानुसार या स्पर्धेसाठी कर्नाटक संघात केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश कर
केएल राहुल


बंगळुरु, 18 डिसेंबर (हिं.स.)कर्नाटकने विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) धोरणानुसार या स्पर्धेसाठी कर्नाटक संघात केएल राहुल, देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळण्याचे निर्देश दिले आहेत.

कर्नाटकला झारखंड, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, त्रिपुरा, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. संघ त्यांचे लीग सामने अहमदाबादमध्ये खेळणार आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या बाद फेरीत पोहोचण्यात संघ अपयशी ठरला होता. तरीही मयंक अग्रवालला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. करुण नायर या संघाचा उपकर्णधार असणार आहे.केेएल राहुल विजय हजारे ट्रॉफीत खेळणार असल्याने या संघाला आणखी मजबूती मिळाली आहे. राहुलकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. आता या स्पर्धेत तो किती धावा करतो याकडेच क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.

विजय हजारे ट्रॉफीसाठी कर्नाटक संघ:

मयंक अग्रवाल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, करुण नायर, आर. स्मरन, के.एल. श्रीजीथ, अभिनव मनोहर, श्रेयस गोपाल, वैशाख विजयकुमार, एल. मनवंत कुमार, श्रीशा एस. आचार, अभिलाष शेट्टी, बी.आर. शरथ, हर्षित धर्मानी, ध्रुव प्रभाकर, के.एल. राहुल आणि प्रसीध कृष्णा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande