
रत्नागिरी, 18 डिसेंबर, (हिं. स.) : नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
डॉ. योगिता खाडे-आयरे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या रत्नागिरीच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केली. रत्नागिरीच्या संघाचे नेतृत्व कर्णधार स्वरा संसारे (गुहागर), उपकर्णधार सानिया महाकाळ (रत्नागिरी) यांनी केले. या संघात गार्गीय चव्हाण (गुहागर), रिया खातू (गुहागर), प्रज्ञा मोहिते (चिपळूण), सेजल कालेकर (राजापूर), मनाली निंबरे (रत्नागिरी), सलोनी धावडे (राजापूर), सानिका आलीम (रत्नागिरी), यशस्वी धावडे (राजापूर), तेजल कुवळेकर (राजापूर) आणि हर्षाली पांचाळ (राजापूर) या खेळाडूंनी सहभाग घेतला. संघाचे व्यवस्थापक स्वप्नील धामणस्कर आणि युवराज मोरे होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी