धुळ्यातील छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल येथे वार्षिक क्रीडा महोत्सव
धुळे , 18 डिसेंबर (हिं.स.) श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल मध्ये 19 वा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. क्रीडा महोत्सव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खो-खो संघाचे अध्यक्ष आणि अभिमन्यू पुरस्कार सन्मानित श्री पंढरीना
क्रीडा  महोत्सव


धुळे , 18 डिसेंबर (हिं.स.) श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल मध्ये 19 वा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. क्रीडा महोत्सव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खो-खो संघाचे अध्यक्ष आणि अभिमन्यू पुरस्कार सन्मानित श्री पंढरीनाथ राजाराम बडगुजर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री दादासो सुभाषजी देवरे, सौ अश्विनीताई देवरे, प्रकल्प समन्वयक श्री एस बी पाटील, प्राचार्य श्री आशिष काटे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय खेळात निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी मशाल पेटवून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन केले. मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून क्रीडा दिनाचे उद्घाटन करण्यात आले त्यात प्रथम क्रिकेट, खो खो, कबड्डी, हॉलीबॉल, रस्सीखेच, रिले आदी खेळांचा समावेश करण्यात आले.प्रमुख मान्यवर यांनी क्रीडा स्पर्धांचे जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. क्रीडामुळे शारीरिक आरोग्य व मानसिक बळ वाढते, असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनी नियमित व्यायाम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. प्राचार्य आशिष काटे यांनी शाळेच्या क्रीडा यशाची माहिती दिली.विद्यार्थ्यांनी विविध जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल त्यांनी विद्याथ्यांचे अभिनंदन केले. त्यात क्रीडाशिक्षक राजेश मोरे व हेमराज भामरे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. विजेत्या विद्यार्थ्यांना सौ अश्विनीताई देवरे यांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande