​लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज
लातूर, 18 डिसेंबर (हिं.स.) जगातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान भाजपाला कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे मिळाला आहे. लातूरच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आणि हक्काचा निधी मिळवण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे
लातूरचा निर्धार: एकजूट, समर्पण आणि लोकसंपर्कातून भाजपचा विजय निश्चित!  ​लातूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज


लातूर, 18 डिसेंबर (हिं.स.) जगातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान भाजपाला कार्यकर्त्यांच्या समर्पणामुळे मिळाला आहे.

लातूरच्या विकासाचा रथ अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी आणि हक्काचा निधी मिळवण्यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास महसूल मंत्री तथा निवडणूक प्रदेश प्रभारी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

​बैठकीतील महत्त्वाचे सुवर्णक्षण:

​विजयी मंत्र: नेत्यांच्या निवडणुका झाल्या, आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत!

कार्यकर्त्यांच्या पाठीशी नेते आपली संपूर्ण ताकद उभी करतील.

​विकासाची शिदोरी: केंद्र व राज्य सरकारने लातूरच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. हा विकास घराघरांत पोहोचवण्याचे आवाहन.

​सावधानतेचा इशारा:

कार्यकर्त्यांनी 'अतिआत्मविश्वास' न बाळगता मतदारांशी संपर्क वाढवावा आणि विरोधकांच्या खोट्या प्रचाराला चोख प्रत्युत्तर द्यावे.

काँग्रेसला खिंडार: भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग!

​निवडणुकीपूर्वीच लातूरमध्ये राजकीय समीकरणे बदलली असून, ना. बावनकुळे यांच्या उपस्थितीत खालील मान्यवरांनी

भाजपमध्ये प्रवेश केला:

गौरव काथवटे (माजी नगरसेवक, काँग्रेस), स्वाती जाधव (उपाध्यक्षा, प्रदेश रोजगार सेल, काँग्रेस), दिलीप बेरूलकर (सचिव, काँग्रेस), बळीराम गाडेकर, अशोक पाटील (जिल्हाध्यक्ष, स्वराज्य पक्ष)

​प्रमुख उपस्थिती

​यावेळी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, प्रदेश सचिव किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांच्यासह भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि शेकडो उत्साही कार्यकर्ते उपस्थित होते.

​विरोधकांच्या खोट्या आमिषांना बळी न पडता, आम्ही लातूरच्या विकासासाठी जीवाचे रान करू!

-आ. संभाजी पाटील निलंगेकर

​भाजप

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande