नांदेड : महसूल विभागाने पकडली 5 लाखांची अवैध वाळू
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.) : माहूर तालुक्यातील मौजे साकुर ते कुपटी रस्त्यावरील नाल्यातून वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा फार्मट्रेक कंपनीचा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रा
नांदेड : महसूल विभागाने पकडली 5 लाखांची अवैध वाळू


नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.) : माहूर तालुक्यातील मौजे साकुर ते कुपटी रस्त्यावरील नाल्यातून वाळू वाहतूक करणारा विना नंबरचा फार्मट्रेक कंपनीचा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकाने पकडला. सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोनतुला तसेच माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप व नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नदीपात्रे व नाल्यांवर वाळू चोरी रोखण्यासाठी बैठे व फिरते पथक कार्यरत आहेत. पैनगंगा नदी पात्रावर बैठया पथकांची नेमणूक झाल्याने अनेक ठिकाणी वाळू तस्कर नाल्यांमार्गे वाळू चोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.

तहसीलदार अभिजीत जगताप व नायब तहसीलदार कैलास जेठे यांच्या मार्गदर्शनाखाली फिरत्या पथकातील ग्राम महसूल अधिकारी पवन यादव हे कुपटी ते साकुर रस्त्यावर गस्त घालत असताना नाल्यातून वाळू भरून बाहेर येणारा विना नंबरचा ट्रॅक्टर आढळून आला. ट्रॅक्टरची पाहणी केली असता त्यामध्ये वाळू वाहतूक सुरू असल्याचेनिष्पन्न झाले. सदर ट्रॅक्टर ताब्यात घेऊन माहूर तहसील कार्यालयात लावण्यात आला. याप्रकरणी महसूल सहाय्यक वैभव घोडे यांनी तहसीलदारांच्या मार्गदर्शनात कायदेशीर कारवाईसाठी प्रस्ताव सादर केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande