छ. संभाजीनगर : बावनकुळे यांच्या उपस्थितीत ठरली भाजपची रणनीती
छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात संचलन समितीची महत्वपूर्ण बैठक भाजपा विभागीय कार्यालय येथे
अ


छत्रपती संभाजीनगर, 18 डिसेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री तथा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात संचलन समितीची महत्वपूर्ण बैठक भाजपा विभागीय कार्यालय येथे संपन्न झाली..

या बैठकीत आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीवर सखोल चर्चा करण्यात आली. संघटनात्मक बळकटी, प्रभावी रणनीती आणि नियोजनबद्ध कामकाजाबाबत मार्गदर्शन करण्यात आले..यावेळी आमदार श्री.संजय केनेकर, विभागीय संघटन मंत्री श्री.संजय कौडगे, शहराध्यक्ष श्री.किशोर शितोळे, जिल्हाध्यक्ष श्री.संजय खंबायते, श्री.शिरीष बोराळकर, श्री.समीर राजुरकर, श्री.किरण पाटील, श्री.प्रशांत देसरडा, श्री.अनिल मकरिये, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

----------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande