नांदेडमधून २३ सराईत गुन्हेगार तडीपार,
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी २०२५ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस
नांदेडमधून २३ सराईत गुन्हेगार तडीपार,


नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।नांदेड शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी २०२५ या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एकूण २३ गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रभावी कारवाई केली आहे.

तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर शस्त्र अधिनियम, पोक्सो आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून त्यांचावयोगट २३ ते ३५ वर्षे इतका आहे.

पोलीस ठाणेनिहाय तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या नांदेड ६, विमानतळ २, वजिराबाद ग्रामीण १३, इतवारा १, शिवाजीनगर १ अशी एकूण २३ गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंजने व प्रशांत शिंदे यांचे सहकार्य लाभले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande