
नांदेड, 18 डिसेंबर (हिं.स.)।
नांदेड जिल्ह्याच्या भागात
गाय घेऊन जाणारा टेम्पो सोनखेड पोलिसांनी पकडला असून दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड पोलिसांनी ही माहिती दिली आहे
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातीलसोनखेड येथील कलंबर फाटा परिसरात सोनखेड पोलीस गस्तीवर असताना गुप्त माहितीच्या आधारे एम. एच ४८ बी. सी ३४०४ या क्रमांकाच्या अशोक लेलँड या टेम्पोमध्ये इयर टॅग किंवा ग्राम पंचायतीचा दाखला कोणताही पुरावा सोबत नसताना एक गाय ही कत्तलीच्या उद्देशाने घेऊन जाताना पकडण्यात आले आणिदोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपीवर कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणे या कलमाखाली सोनखेड पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर दुसरा आरोपी परभणी जिल्ह्यातील असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पो. हे. कॉ. विश्वनाथ हंबर्डे हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis