हॉटेलच्या आड वेश्या व्यवसाय; खालापूर पोलिसांनी केला पर्दाफाश
रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.) खालापूर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हॉटेलमध्ये चालणारा अनैतिक व्यवसाय उघडकीस आणला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी घडली असून सायंकाळी
हॉटेलच्या आड वेश्या व्यवसाय; खालापूर पोलिसांनी केला पर्दाफाश


रायगड, 18 डिसेंबर (हिं.स.)

खालापूर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत हॉटेलमध्ये चालणारा अनैतिक व्यवसाय उघडकीस आणला आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी घडली असून सायंकाळी सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास मौजे कलोते गावच्या हद्दीतील हॉटेल सत्कार इन येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवांत निवास, रूम नं. 2, मोगलवाडी, खोपोली, ता. खालापूर येथे राहणारी एक महिला आरोपी हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आरोपीने पीडित महिलेकडून तिच्या इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसाय करून घेतला. या माध्यमातून मिळणाऱ्या मोबदल्यावर स्वतःची उपजीविका करत ती बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय करत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

खालापूर पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून आरोपीस रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 1.07 वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून हॉटेल्समध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांच्या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 440/2025 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 143(2) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

खालापूर पोलिसांनी भविष्यातही अशा अनैतिक व बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande