तिवसा तालुक्यातील प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था.
अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) तिवसा ते कुऱ्हा या मार्गावर एशियन डेव्हलपमेंट बँक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली प्रवासी निवारे काही महिन्यांतच दुर्दशेला सामोरी जात असून, ग्रामीण प्रवाशांसाठी
तिवसा तालुक्यातील प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था.. निवाऱ्यातील भिंतींवर अश्लील लिखाण,


तिवसा तालुक्यातील प्रवासी निवाऱ्याची दयनीय अवस्था.. निवाऱ्यातील भिंतींवर अश्लील लिखाण,


अमरावती, 18 डिसेंबर (हिं.स.) तिवसा ते कुऱ्हा या मार्गावर एशियन डेव्हलपमेंट बँक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त निधीतून लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेली प्रवासी निवारे काही महिन्यांतच दुर्दशेला सामोरी जात असून, ग्रामीण प्रवाशांसाठी उभारलेल्या या सोयी आज अक्षरशः वाऱ्यावर सोडल्या गेल्या आहेत.तिवसा तालुक्यात ग्रामीण भागात काही ठिकाणी एस.टी. डेपो नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला, वृद्ध नागरिक व मजूर वर्ग यांची थांबण्याची पावसापासून, उन्हापासून संरक्षण मिळविण्यासाठी या प्रवासी निवाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. एकमेव सरकारी सोय म्हणून प्रशासनाने प्रवासी निवाऱ्याची निर्मिती केली. परंतु पाहता पाहता या प्रवासी निवार्यातील दगडी बाके गायब झाली आहे तर काही ठिकाणी बाके तुटून पडले आहे. काही ठिकाणी लोखंडी रेलिंग उचलून नेलेली आहे. प्रवासी निवाऱ्यातील भिंतींवर अश्लील लिखाण केले आहे तर काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग, गारे, दुर्गंधी, छताची उडालेली रंगसफेदी आणि रात्री दारुड्यांचे अड्डे – अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. जिथे मुली व महिलांनी सुरक्षित थांबायला हवे तिथे अश्या प्रकारचे चित्र उभे राहिले आहे. रात्रीच्या वेळी अवैध मद्यपींची वर्दळ वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.आश्चर्य म्हणजे काही ठिकाणी तर प्रवासी या निवाऱ्यांत थांबायलाही तयार नाहीत. निवाऱ्याच्या आत उभं राहण्यापेक्षा लोक झाडाखाली उभे राहून बस वा वाहन येण्याची वाट पाहत आहेत. पावसात भिजतात, उन्हात भाजतात, पण निवाऱ्याकडे बघायलाही तयार नाहीत. कारण त्यांची अवस्था पाहूनच तिथे पाऊल ठेवण्याचं धाडस अद्याप तरी कुणीच केलेले नाही. या निवाऱ्यांचा मालक कोण, देखभाल कोण करणार, जबाबदार कोण – याकडे प्रशासनाने दुर्लक्षच केल्याचं दिसून येत आहे. लाखो रुपयात उभारलेली सार्वजनिक सोय आज फक्त कचरा टाकण्याची जागा व पानफेक, मद्यपींची मौजमजा करण्याची खोली ठरत असताना, जर तातडीने दुरुस्ती, सफाई व सुरक्षा व्यवस्था पुरवली नाही, तर ही काही निवारे प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे तर सरकारी पैशाच्या वाया गेलेल्या उधळपट्टीचे गुटक्याच्या पिचकारीसारखे कायमचे व्यंगचित्र बनून राहणार यात शंका नाही.

यासंदर्भात कवाइगव्हाण येथील ज्येष्ठ नागरिक वासुदेव चौधरी आमच्यासारख्या वृद्धांना उन्हापासून आणि पाण्यापासून संरक्षण मिळावे यासाठी प्रवासी निवारे बांधण्यात आलेले आहे, पण आज त्यांची अवस्था पाहून तिथे बसण्याची इच्छा होत नाही. बसण्याचे दगडाचे बेंच तुटलेली, दुर्गंधी, कचरा यामुळे येथे बसावं असे वाटत नाही. आमच्यासाठी बांधलेली सोय आम्हालाच वापरता येत नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे. प्रशासनाने एकदा उभारणी केली की त्याकडे पुन्हा लक्ष देत नाही, म्हणून ह्या सुविधा दिसायला आहेत, पण काहीच उपयोग नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande