अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी -कैलास पवार
नंदुरबार, 19 डिसेंबर (हिं.स.)। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचे वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणेबंधनकारक केले असून ई-केवायसी प्रलंबित असले
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी -कैलास पवार


नंदुरबार, 19 डिसेंबर (हिं.स.)। सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत धान्याचे वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी जिल्हा

प्रशासनाने अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिका लाभार्थ्यांचे ई-केवायसी करणेबंधनकारक केले असून ई-केवायसी प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर 2025 पूर्वी ई-केवायसी पूर्ण करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वयेकेले आहे. जिल्ह्यातील एकूण 12,59,063 लाभार्थ्यांपैकी 9,41,390 लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण झाले असून, 3,17,673

लाभार्थ्यांचे प्रमाणीकरण अजून बाकी आहे ई-केवायसी पूर्ण होण्याची टक्केवारी 74.77 टक्के आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande