आकांक्षित जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करावी - अतिरिक्त सचिव पियुष सिंह
नंदुरबार, 19 डिसेंबर (हिं.स.)आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम प्रभावी असून, त्यांची पूर्ण प्रयत्नाने अंमलबजावणी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि जिल्हा राज्यात अव्वल स्थान मिळवेल, असे प्रतिपादन भारत स
आकांक्षित जिल्ह्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पूर्ण क्षमतेने अंमलबजावणी करावी - अतिरिक्त सचिव पियुष सिंह


नंदुरबार, 19 डिसेंबर (हिं.स.)आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम प्रभावी असून, त्यांची पूर्ण प्रयत्नाने

अंमलबजावणी केल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील आणि जिल्हा राज्यात अव्वल स्थान

मिळवेल, असे प्रतिपादन भारत सरकारच्या उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांनी केले.

भारत सरकार उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आकांक्षित जिल्हा

कार्यक्रम व आकांक्षित तालुका कार्यक्रमाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत

होते. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे

मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.

विनय सोनवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक

नंदकुमार पैठणकर तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना अतिरिक्त सचिव श्री. सिंह पुढे म्हणाले की, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात सुरू

असलेल्या कामांचा दर्जा समाधानकारक असून, सर्वांच्या सहभागातून ही कामे होत असल्यामुळे या यशाचे श्रेय

सर्व संबंधितांना जाते. ग्रामस्तर, तालुकास्तर व जिल्हास्तरावर सर्वांनी उत्तम कामगिरी केली असून, त्याबद्दल

त्यांनी सर्वांचे आभार मानले. आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचे कार्य यापुढेही असेच प्रभावीपणे सुरू राहील, अशी

अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेले विविध उपक्रम, आतापर्यंत झालेली कामे तसेच पुढील नियोजनाबाबत पीपीटी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

यामध्ये आरोग्य, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कृषी, किसान क्रेडिट कार्ड, ॲग्री-स्टॅग,

मोटारसायकल ॲम्ब्युलन्स, मत्स्यव्यवसाय, स्ट्रॉबेरी लागवड, तोरणमाळ पर्यटन विकास, सिताफळ फळ

प्रक्रिया उद्योग, सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियान, मुळवाट कक्ष, मिशन जलबंधू, आमची अभ्यासिका,

आदर्श ग्राम अभियान, दिशा अभियान, शाळा आदी उपक्रमांची माहिती देण्यात आली.

यावेळी सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन अभियानांतर्गत नवीन टप्प्याची सुरुवात आशा वर्कर श्रीमती प्रमिला

गावीत व श्रीमती वंदना गावीत यांना अतिरिक्त सचिव श्री. पियुष सिंह यांच्या हस्ते किट देऊन करण्यात

आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande