
नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)नाशिक महानगरपालिकेच्या निवडणूकीसाठी भाजप आणि शिंदे सेना यांच्यात युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनीच हा दावा खोडला आहे.
भाजपाकडे सर्व जागांवर अत्यंत सक्षम उमेदवार असल्याने स्वबळावर निवडणूका घ्याव्यात असा प्रस्ताव यापूर्वीच स्थानिक पातळीवरून वरीष्ठांकडे पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. नाशिक महापालिके च्या निवडणूकीसाठी सध्या भाजपा मुलाखती घेत असून सुरू पक्षाकडे सुमारे एक हजार इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे भाजपाने २०१७प्रमाणेच ही निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून तसे पक्षाच्यावरीष्ठांना कळवले आहे, असे केदार यांनी कळवले आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिंदे सेना यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर केदार यांनी पाठवलेला हे स्पष्टीकरण महत्वाचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV