
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल, भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदे भरण्याची भाजपा नेते प्रशांत यादव यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील महसूल विभाग व भूमी अभिलेख विभागातील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, यासाठी भाजप नेते प्रशांत यादव यांनी राज्याचे श्री. बावनकुळे यांची मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात भेट घेतली. ही भेट भाजप नेते प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली झाली. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस राजू भाटलेकर उपस्थित होते.
या भेटीत रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रशासकीय अडचणी मांडून, रिक्त पदांमुळे रखडलेली कामे व सेवांवर होणारा परिणाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री. बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी