मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर
जळगाव, 19 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे
मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर


जळगाव, 19 डिसेंबर (हिं.स.) जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्र जारी करत ही महत्त्वाची जबाबदारी आ. भोळे यांच्या खांद्यावर दिली आहे. जळगाव शहरात आधी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या निकालांमुळे आमदार राजूमामा भोळे यांचा ‘करिश्मा’ निर्विवादपणे सिद्ध झाला आहे. लागोपाठ मिळालेल्या या यशामुळे आणि त्यांच्या प्रभावी संघटन कौशल्यामुळेच आता आगामी महापालिका निवडणुकीतही ‘मामां’च्या नेतृत्वावर पक्षाने मोठा विश्वास दाखवला आहे. विजयाची ही परंपरा कायम राखण्यासाठी पक्षाने त्यांच्याकडे ही धुरा सोपवली असल्याचे मानले जात आहे. भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणूक २०२५ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांच्या संघटन कौशल्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. सर्वांना सोबत घेऊन, अथक परिश्रम करून पक्षातर्फे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आता निवडणूक प्रमुख म्हणून आ. भोळे यांच्यावर असणार आहे. या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande