
बीड, 19 डिसेंबर,(हिं.स.)। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळावा यासाठी बहुजन मुक्ती पार्टीकडून २५ डिसेंबर रोजी शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बीड येथून सकाळी ११ वाजता निघणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून बहुजन मुक्ती पार्टीकडून राज्यभर निवेदनाद्वारे सरकारकडे मागण्या करण्यात येत आहेत. मात्र केंद्र सरकार शेतकऱ्यांची थट्टा करत असल्याचा आरोप आहे.
सरकारने प्रत्येक वस्तूवर जीएसटी लावून वसुली सुरू केली. पण शेतमालाला हमीभाव देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मोर्चामध्ये खालील मागण्या मांडण्यात येणार आहेत. कापसाला १२ हजार रुपये, सोयाबीनला ७ हजार रुपये आणि तुरीला १२ हजार रुपये भाव द्यावा. सीआयकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवावी. विदेशातून कापूस आणि सोयाबीन आयात बंद करावी. हमीभावापेक्षा कमी दराने होणारी खरेदी तात्काळ थांबवावी. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis