कंत्राटी पद्धतीने वाहन भाड्याने घेण्यासाठी 26 डिसेंबरपर्यंत निविदा सादर करावी - राज्यकर उपायुक्त
नंदुरबार, 19 डिसेंबर (हिं.स.) वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने चार आसनी वाहन दोन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यासाठी मोहरबंद निविदा मागविण्यात येत असून इच्छुक वाहनधारकांनी 26 डिसेंबर, 2025 रोजी 01 वाजेपर्यंत आस्थापना अधिकारी, वस
कंत्राटी पद्धतीने वाहन भाड्याने घेण्यासाठी 26 डिसेंबरपर्यंत निविदा सादर करावी - राज्यकर उपायुक्त


नंदुरबार, 19 डिसेंबर (हिं.स.) वस्तू व सेवा कर (GST) कार्यालयासाठी कंत्राटी पद्धतीने चार आसनी वाहन दोन वर्षांच्या कालावधीसाठी घेण्यासाठी मोहरबंद निविदा मागविण्यात येत असून इच्छुक वाहनधारकांनी 26 डिसेंबर, 2025 रोजी 01 वाजेपर्यंत आस्थापना अधिकारी, वस्तू व सेवा कर कार्यालय इंदिरा व्यापारी संकुल, गिरीविहार कॉलनी कोरीट रोड, नंदुरबार यांच्याकडे समक्ष सादर कराव्यात, असे आवाहन राज्यकर उपायुक्त किशोर चौरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. प्राप्त झालेल्या निविदा 29 डिसेंबर 2025 रोजी राज्यकर उपायुक्त (प्रशासन) यांच्या दालनात उघडण्यात येतील. निविदेच्या अटी व शर्ती व अधिक माहितीसाठी आस्थापना अधिकारी, वस्तू व सेवा कर कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02564-230101 नंदुरबार यांच्याकडे संपर्क साधावा असेही राज्यकर उपायुक्त श्री. चौरे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande