शासकीय यंत्रणांनी समन्वयातून घाटांचा आराखडा अंतिम करावा आयुक्त सिंह
नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पूर्वतयारी नियोजनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वायातून घाटांशी संबंधित सर्व आराखडे अंतिम करावे, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर स
शासकीय यंत्रणांनी समन्वयातून घाटांचा आराखडा अंतिम करावा आयुक्त सिंह


नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)। सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पूर्वतयारी नियोजनाच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वायातून घाटांशी संबंधित सर्व आराखडे अंतिम करावे, असे निर्देश कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांनी दिले. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा अनुषंगाने घाटांशी सबंधित नियोजन संदर्भात आज सकाळी आयोजित बैठकीत आयुक्त श्री. सिंह बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, किशोर काळे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार कोळी, सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, तांत्रिक सहाय्यक व्ही जी महाले, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आयुक्त श्री सिंह म्हणाले की, कुंभमेळा कालावधीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता घाटांचा वापर व क्षमतेचे मूल्यांकन यासाठी एकसमान, प्रमाणित व मान्यताप्राप्त चौकट निश्चित करणे आवश्यक आहे. त्यामुळे सुरक्षित व गर्दी व्यवस्थापनासाठी याची मदत होणार आहे. जलसंपदा विभाग, पोलीस विभाग, महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी एकत्रितपणे घाटांची पाहणी करावी. पाहणी दरम्यान घाटांचे नामकरण व अंतिम यादी निश्चित करावी. वापरायोग्य घाट व त्यांची लांबी, क्षेत्रफळ, प्रत्येक घाटाची वहन क्षमता, प्रत्येक व्यक्तीची घाटांवर थांबण्याची किमान वेळ त्यासाठीची गणना पद्धत व सूत्र निश्चित करावे. प्रत्येक घाटावर प्रवेश मार्ग व निर्गमन मार्ग, आपत्कालिन स्थलांतर मार्ग, अतिरिक्त प्रवेश मार्गाची गरज किंवा निर्बंध तसेच बॅरिकेडिंगची आवश्यकता याबाबत सुद्धा पाहणीतून निर्णय घ्यावा. घाटावर व घाटाजवळ तात्पुरत्या पायाभूत सुविधा ज्यात स्वच्छतागृहे, वस्त्रांतर खोल्या, वॉच टॉवर, वैद्यकीय केंद्र यांची संख्या घाटांच्या क्षेत्र फळानुसार निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्त श्री. सिंह यांनी दिल्या. घाटांची नावे अंतिम करतांना त्यांचे क्षेत्रफळ व जिओ टॅग लोकेशन निश्चित असावे. घाटांची वहन क्षमता, घाटांकडे येणाऱ्या मार्गावरील गर्दीचे नियेाजन, घाटांवर नागरिक व अति महत्वाच्या व्यक्तींची प्रवेश व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था यासह आपत्कालिन काळात सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपायोजनांचा आराखडा पोलीस विभागाने तयार करावा त्यानुसार इतर विभागांना याच्या आधारावर आपले आराखडे निश्चित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री प्रसाद यांनी दिल्या. यावेळी जलसंपदा विभागाकडून घाटांवरील झालेल्या व नियोजित कामांची माहिती कार्यकारी अभियंता श्रीमती शहाणे यांनी दिली

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande