
नाशिक, 19 डिसेंबर (हिं.स.)।
- महानगरपालिकेची निवडणूक लढवायची असेल तर खबरदार अतिक्रमण नसेल तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल आणि निवडणुकीला उभे राहणार असाल तर अतिक्रमण नसल्याचे शपथपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असतानाच निवडणूक आयोगाने आता प्रत्येक उमेदवाराला आपलं अतिक्रमण नाही याचं शपथपत्र देणे बंधनकारक केले असल्याने उमेदवारांवरती टांगती तलवार मात्र कायम आहे .
राज्यामध्ये नुकतीच नगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकांची रणधुमाळी संपत असताना आता 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होत आहे. नगरपालिका आणि नगरपंचायती निवडणुकीमध्ये उभे राहणाऱ्या उमेदवारांना आपले अतिक्रमण आहे की नाही याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देणे बंधनकारक नव्हतं मात्र येत्या 23 डिसेंबर तारखेपासून राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे ही प्रक्रिया सुरू होत असताना नेहमीप्रमाणेच उमेदवारांना आपल्याकडे कोणत्याही प्रकारची थकबाकी नाही याबाबतची माहिती आणि ना हरकत प्रमाणपत्र हे सादर करायची आहे. पण यावेळी मात्र राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकेमध्ये होत असलेल्या लोकप्रतिनिधींच्या निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला असून त्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना आपण आणि आपल्या नातेवाईकांचं कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नाही असं लेखी प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक केलेले आहे यामुळे निवडून येणाऱ्या महानगरपालिकेतील नगरसेवकांची जबाबदारी अजूनच वाढलेली आहे हे यातून समोर येत असून जर अतिक्रमणामध्ये भविष्यात निवडून आलेले लोकप्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक सहभागी असल्याचे समोर आले तर त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची टांगटी तलवार ही कायम राहणार आहे याचा मोठा झटका अनेक पक्षाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना बसण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे याबाबत काही बदल होतो का किंवा हाच निर्णय कायम राहतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आ
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV