
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : मंडणगड तालुक्यातील घरगुती उद्योग, स्थानिक उद्योजक व युवकांना व्यासपीठ देणाऱ्या 'मंडणगड जनता बाजार' या उपक्रमाची सुरुवात येत्या रविवारी ( दि. २१) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे. मंडणगड घडवा, मंडणगड वाढवा, मंडणगड जगवा या संकल्पनेतून सुरू होणारा हा उपक्रम दर रविवारी नियमितपणे होणार आहे. मुंबई-पुण्यात यशस्वी झालेल्या मंडणगडकर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून, बिझनेस सेशन, विक्री, नेटवर्किंग व प्रेरणादायी बिझनेस टॉकचे आयोजन करण्यात आले आहे.हा उपक्रम मंडणगडमधील लिटिल लॉर्डस् इंटरनॅशनल ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये होणार असून, यशतेज फाउंडेशन बिझनेस फोरमसह विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी