
डोंबिवली, 19 डिसेंबर (हिं.स.)।
केरळसारख्या डाव्या विचारसरणीच्या राज्यामध्ये वेगळा विचार करून विकास करणाऱ्या पार्टीचा महापौर केला. आपणही तोच विचार करून
विकास करणाऱ्या पक्षाबरोबर गेलेच पाहिजे असे डोंबिवलीकर मतदारांना सांगितले पाहिजे. डोंबिवली हा बालेकिल्ला आहे. जर केरळसारखे राज्य असा विचार करत आहे याचा अर्थ लक्षात घ्या. काळाची गरज ही लक्षात घेता विकासासाठी मतदान करा असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीकरांसह जमलेल्या तमाम भाजपच्या कार्यकर्त्यांना केला.
पश्चिमेकडील भागशाळ मैदानात भाजपाच्या माध्यमातून भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जाहीर संवाद मेळावा शुक्रवारी झाला. यावेळी भाजपा माजी खासदार कपिल पाटील, ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि सर्व माजी नगरसेवकांसह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. पश्चिम मंडळ अध्यक्ष पवन पाटील व जोशी यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कपिल पाटील, जगन्नाथ पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी चव्हाण पुढे म्हणाले, इथल्या नागरिकांशी निगडीत विकासकामांना पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जायचे असेल तर पारदर्शकपणे काम करणारी व्यक्ती महापौरपदी असणे गरजचे आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला गतिमान करण्याचे काम झाले आहे. हा वेगाने विकास करताना सबका साथ, सबका विकास सबका विश्वास आणि प्रयास या चारही गोष्टींचा मेळ त्यांच्या कामामध्ये आहे असे सांगितले.
चौकट : भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जाहीर संवाद मेळाव्यात व्यासपीठावर डोंबिवली विभागातील सर्व प्रभाग क्षेत्रातील संभाव्य उमेदवारांना व्यासपीठावर जागा देण्यात आली होती. सर्व प्रभागासाठी आमच्याकडे दमदार इच्छुकांची मोठी संख्या आहे असा प्रचारही या माध्यमातून भाजपाने दाखवून दिले अशी चर्चा लोकांमध्ये होती.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi