परभणी - मनसेद्वारे सोमवारी पदाधिकारी बैठक व इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन
परभणी, 19 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोमवार 22 डिसेंबर रोजी वसमत रस्त्यावरील हॉटेल मधुर भोज या ठिकाणी पदाधिकारी व
परभणी - मनसेद्वारे सोमवारी पदाधिकारी बैठक व इच्छुकांच्या मुलाखतीचे आयोजन


परभणी, 19 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोमवार 22 डिसेंबर रोजी वसमत रस्त्यावरील हॉटेल मधुर भोज या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक तसेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.

या बैठकीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रेंगे पाटील, जिल्हा संघटक श्रीनिवास लाहोटी, मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक, विधी जिल्हाध्यक्ष निलेश पुरी, मनविसे उपाध्यक्ष सतीश भणभने, शहर संघटक श्रीकांत पाटील, शहर उपाध्यक्ष खंडू राऊत, आनंद शिंदे आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande