रत्नागिरीत शनिवार-रविवारी महाभारत व्याख्यानमाला
रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या शनिवार-रविवारी (दि. २०, २१ डिसेंबर) विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरीत येत्या जानेवारीत होणार असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात महाभारत या व
रत्नागिरीत शनिवार-रविवारी महाभारत व्याख्यानमाला


रत्नागिरी, 19 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरीत येत्या शनिवार-रविवारी (दि. २०, २१ डिसेंबर) विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरीत येत्या जानेवारीत होणार असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात महाभारत या विषयावर निरूपण होणार आहे. महोत्सवाच्या वातावरणनिर्मितीसाठी व्याख्यानमाला होणार आहे. येत्या २० आणि २१ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत चिपळूण येथील प्रख्यात प्रवचनकार धनंजय चितळे यांची विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत ही व्याख्यानमाला होणार आहे.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ही व्याख्यानमाला होणार आहे. महाभारतासारख्या अफाट ग्रंथाचे पाठज्ञान सर्वांना व्हावे, तो अधिक सोपा जावा, यासाठी ही व्याख्याने होणार आहेत. व्याख्याने सर्वांसाठी खुली आहेत. धनंजय चितळे चिपळूण येथील प्रसिद्ध प्रवचनकार आणि लेखक आहेत. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवरील त्यांची प्रवचने लोक आवर्जून ऐकतात.

त्यांच्या रत्नागिरीतील व्याख्यानांचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजक संस्थांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande