
परभणी, 19 डिसेंबर (हिं.स.)। शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६च्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाज करण्यासाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी व सर्वकक्षांचे नोडल अधिकारी व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांचे महानगरपालिकेच्या बी. रघुनाथ सभागृहात प्रशिक्षण पार पडले.
प्रशिक्षणामध्ये सर्व कक्षप्रमुख व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांना त्यांच्या कामाचे स्वरूप, जबाबदारी, महत्व याबाबत माहिती देऊन समन्वयाने व वेळेत कामकाज करण्याच्या अनुषंगाने तहसिलदार संदीप राजापुरे, निवडणूक निर्णय अधिकारी रतनसिंह साळोक व उपायुक्त प्रज्ञावंत कांबळे यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणास निवडणूक अधिकारी नितीन नार्वेकर, निवडणूक निर्णय अधिकारी रतनसिंह साळोक, अतिरिक्त आयुक्त मिनिनाथ दंडवते, उपायुक्त बबन तडवी, प्रज्ञावंत कांबळे, मुख्य लेखा परिक्षक श्रीरंग भुतडा, तहसिलदार संदीप राजापुरे व निवडणूक कामी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis