उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात शनिवारी मतदान
लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तसेच उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे
उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात शनिवारी मतदान


लातूर, 19 डिसेंबर (हिं.स.)।

लातूर जिल्ह्यात उदगीर, निलंगा नगरपरिषद व रेणापूर नगरपंचायत क्षेत्रात 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. तसेच उदगीर, औसा, निलंगा, अहमदपूर नगरपरिषद आणि रेणापूर नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे या नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात 20 व 21 डिसेंबर रोजी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत.

त्यानुसार औसा येथे रविवारी भरणारा आठवडी बाजार बंद राहणार असून, या दिवशीचा आठवडी बाजार इतर दिवशी भरविण्यात येणार आहे. मार्केट ॲण्ड फेअर ॲक्ट 1982 चे कलम 5 (अ) मधील तरतुदीनुसार पणन संचालक यांनी दिलेल्या मान्यतेनुसार हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande